मुंबई – सध्या जगात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर केवळ अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्येच नव्हे, तर आपल्याही देशात आता वाढत आहे. हा आजच्या या डिजिटल युगातला सर्वात मोठा बदल आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे बऱ्याच गोष्टी ऍडव्हान्स झाल्याचे आपण पाहतो.
ग्लोबल वारी, ग्लोबल वारकरी , हरीनामात दंग जागतीक नेते..
Concept AI art by me
१ pic.twitter.com/ShFWG8hc1K— Amit Wankhade (@Amit_I_Patil) June 29, 2023
भविष्यामध्ये येणारे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापर करून भविष्यामध्ये प्रत्येक क्षेत्र हे विकसित होऊ शकते. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील.
ग्लोबल वारी, ग्लोबल वारकरी , हरीनामात दंग जागतीक नेते..
Concept AI art by me
१ pic.twitter.com/ShFWG8hc1K— Amit Wankhade (@Amit_I_Patil) June 29, 2023
आता यामध्ये जागतिक नेत्यांची देखील भर पडली आहे. यामध्ये अनेक देशांच्या महत्वाच्या व्यक्तींचे फोटो तयार करण्यात आले आहेत. यापूर्वी महाराष्ट्राच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एआय फोटो तयार करण्यात आले होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
— Amit Wankhade (@Amit_I_Patil) June 29, 2023
नेटकऱ्यांनी देखील यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात आहे. दरम्यान, आताच्या फोटोंमध्ये तुम्हाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आदींचा समावेश असल्याचं दिसून येत आहे.