दिल्लीत कपड्याच्या गोदामाला भीषण आग

9 जणांचा मृत्यू, तीन जखमी

नवी दिल्ली : येथील किराडी भागातील एका कापड गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या किराडी भागात मध्यरात्री एका कापड गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत 9 जणांचा बळी गेला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्लीच्या किराडी भागातील कापड गोदामाला सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजता आग लागली. संपूर्ण गोदाम कपड्यांनी भरलेले असल्याने या आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले. दरम्यान, यामध्ये सुरुवातीला तीन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. तर इतर दहा जण गंभीर जखमी झाले होते त्यांच्यापैकी सात जणांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर तिघांवर अद्याप उपचार सुरु आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेले सर्वजण कामगार असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या भीषण आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानीबरोबरच आर्थिक नुकसानही झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आगीचे कारण शोधण्याचे काम दिल्ली पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.