Wanindu Hasaranga T20I Cricket Record : वानिंदू हसरंगाने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 फॉर्मेटमध्ये 100 बळी पूर्ण केले. सध्या श्रीलंकेचा कर्णधार असलेल्या हसरंगाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 2 बळी घेतले. दिग्गज लसिथ मलिंगा नंतर, हसरंगा हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा गाठणारा श्रीलंकेचा दुसरा गोलंदाज ठरला.
विशेष म्हणजे हसरंगाने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 विकेट्स घेण्यासाठी मलिंगापेक्षा कमी सामने घेतले. मलिंगाने 76 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळताना फॉर्मेटमध्ये 100 बळी पूर्ण केले होते, तर हसरंगाने 63 व्या सामन्यातच 100 बळींचा टप्पा गाठला आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये 100 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा हसरंगा हा 11 वा खेळाडू ठरला आहे. हा आकडा सर्वात जलद गाठणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या राशिद खानच्या नावावर आहे, ज्याने केवळ 53 सामन्यांमध्ये हा आकडा गाठला. म्हणजेच हसरंगाला 100 विकेट घेण्यासाठी राशिद खानपेक्षा 10 अधिक सामने खेळावे लागले.
1️⃣0️⃣0️⃣ Wickets Strong!
Massive congratulations to our skipper, Wanindu Hasaranga, on achieving the incredible feat of 1️⃣0️⃣0️⃣ T20I wickets!🎉 🇱🇰#SLvAFG pic.twitter.com/aOQsCnu4nm
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 19, 2024
टी20I मध्ये सर्वात जलद 100 विकेट घेणारे गोलंदाज…
राशिद खान (अफगानिस्तान)- 53 सामने
वानिंदु हसरंगा (श्रीलंका) – 63 सामने
मार्क अडायर (आयर्लंड) – 72 सामने
लसिथ मलिंगा (श्रीलंका) – 76 सामने
ईश सोधी (न्यूझीलंड) – 78 सामने
हसरंगाची टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द…
सप्टेंबर 2019 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वानिंदू हसरंगाने आतापर्यंत 63 सामने खेळले आहेत, 61 डावांमध्ये गोलंदाजी केली आहे आणि 15.36 च्या सरासरीने 101 बळी घेतले आहेत. या कालावधीत, त्याने तीन वेळा ‘फोर विकेट हॉल’ मिळवला आहे, ज्यामध्ये त्याचे सर्वोत्तम कामगिरी 9 धावांत 4 बळी अशी आहे. याशिवाय 53 डावात फलंदाजी करताना हसरंगाने 131.22 च्या स्ट्राईक रेटने 622 धावा केल्या. या कालावधीत, त्याने 2 अर्धशतके झळकावली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 71 होती. याआधी त्याने 2017 मध्ये वनडे सामन्याद्वारे त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.