SL vs AFG : पथुम निसांकाने रचला इतिहास, श्रीलंकेसाठी वनडेत द्विशतक करणारा ठरला पहिला फलंदाज…

Pathum Nissanka Double Hundred : अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडेमध्ये पथुम निसांकाने इतिहास रचला. निसांकाने 139 चेंडूंमध्ये 20 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 210 धावांची खेळी खेळली, ज्यासह तो श्रीलंकेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावणारा फलंदाज बनला.
श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पल्लेकेले येथे खेळला जात आहे, ज्यामध्ये पथुम निसांकाने शानदार द्विशतक झळकावले. ओपनिंगला आलेला निसांका शेवटपर्यंत नाबाद राहिला. म्हणजेच त्याने संपूर्ण 50 षटके फलंदाजी केली. अफगाणिस्तानचा एकही गोलंदाज निसांकाला बाद करू शकला नाही, सर्वजण त्याच्यासमोर असहाय्य दिसत होते.
श्रीलंकेच्या या सलामीवीराने द्विशतकापूर्वी अवघ्या 87 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. निसांकाचे वनडे कारकिर्दीतील हे चौथे शतक होते. अफगाणिस्तानविरुद्ध त्याचे हे पहिले शतक ठरले.
Sri Lanka post a mammoth 381/3 total against Afghanistan as Pathum Nissanka remains unbeaten on a record-breaking 210*! 👊
This is the highest total ever recorded in ODIs at Pallekele. ️
Live Scorecard 📝: https://t.co/z8HCHdOX6P
Watch 👀: https://t.co/CKfwszsd8V#SLvAFG pic.twitter.com/83cY3geCVw
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 9, 2024
श्रीलंकेने फलकावर लावल्या 381 धावा…
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने 50 षटकांत 3 बाद 381 धावा केल्या. या काळात द्विशतक झळकावणाऱ्या निसांकाने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. याशिवाय अविष्का फर्नांडोने 88 चेंडूत 88 धावांची शानदार खेळी केली, ज्यात त्याने 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
Yashasvi Jaiswal : कोण आहे ‘यशस्वी जैस्वाल’ची गर्लफ्रेंड? सोशल मीडियावरील फोटोने एकच खळबळ…
या काळात अफगाण गोलंदाज फ्लॉप राहिले. संघाकडून फरीद अहमद मलिकने सर्वाधिक 2 बळी घेतले. यावेळी फरीदने 9 षटकात 79 धावा दिल्या. उरलेली एक विकेट मोहम्मद नबीनं घेतली.





