कोलंबो :- श्रीलंका क्रिकेट मंडळाने आपल्या वरिष्ठ क्रिकेट संघाच्या सल्लागारपदी माजी आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्या याची नियुक्ती केली आहे. त्याचा मंडळाशी एक वर्षाचा करार झाला आहे.
जयसूर्या या कार्यकाळात संघातील खेळाडू तसेच प्रशिक्षक यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेत त्यांना मार्गदर्शनही करेल. तसेच श्रीलंका मंडळाकडे त्याबाबतचा आहवाल दर महिन्याला सादर करेल जेणेकरुन खेळाडूंच्या कामगिरीबाबत तसेच प्रशिक्षकांच्या भूमिकेबाबत माहिती मिळेल.
जयसूर्या हा सध्या 54 वर्षांचा असून आपल्या मंडळाचा सल्लागार म्हणून पहिल्यांदाच काम करणार आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत श्रीलंका संघाची कामगिरी अत्यंत सुमार राहीली आहे. त्यातच आयसीसीने त्यांच्या मंडळाचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे त्यांच्या खेळाडूंच्या कारकीर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
ICC T20 World Cup 2024 : न्यूयार्कमध्ये रंगणार भारत-पाक लढत…
अर्थात आयसीसीने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली असली तरीही मंडळावर निवडून आलेल्या सदस्यांमुळेच मंडळाची प्रतिमा मलिन झाली होती, त्यातही सुधारणा करण्याची व सदस्यत्व पुन्हा मिळवण्याची जबाबदारी जयसूर्या याच्यावरच आली आहे.