Smile Designing – ॲनेस्थेशियाचा जादा डोस दिल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना हैदराबाद येथील दातांच्या दवाखान्यात घडली आहे. या घटनेत २८ वर्षीय लक्ष्मी नारायण या युवकाचा मृत्यू झाला आहे. त्याचे लवकरच लग्न होणार होते आणि त्यासाठी स्माइल डिझाइनिंगची प्रक्रिया तो पूर्ण करत होता. त्यात ही दुर्घटना घडली आहे.
स्माइल डिझाइन प्रक्रियेत कॉस्मॅटीक सर्जन विशिष्ट साधनांची मदत घेऊन आणि वापर करून संबधित व्यक्तीचे दात अधिक पांढरे करतात. दातांमध्ये अंतर असेल तर तेही झाकले जाते. तुटलेल्या अथवा वाकडे असलेल्या दातांचा पुनर्संचय केला जातो. । Smile Designing
सामान्यत: ही सुरक्षित प्रक्रिया असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम संभवत नाहीत. मात्र काही व्यक्तींना प्रक्रियेनंतर हिरड्यांमध्ये वेदना होण्याची शक्यता असते. योग्य निगा राखली तर या संवेदनशीलतेपासून सुटका होऊ शकते असे या प्रक्रियेच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लक्ष्मी नारायणच्या मृत्यूसंबंधात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की तो स्माइल डिझाइन प्रक्रियेसाठी क्लिनिकमध्ये गेला होता. त्या दिवशी सायंकाळी त्याचे वडिल विंजम रामुलू यांनी त्याला मोबाइलवर कॉल केला होता. । Smile Designing
मात्र क्लिनिकमधील व्यक्तीने त्यांचा कॉल घेतला. त्यावेळी प्रक्रिया सुरू असताना तुमचा मुलगा बेशुध्द पडला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. लक्ष्मी नारायणला तातडीने जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. । Smile Designing
निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नारायणच्या कुटुंबियांनी संबंधित दवाखान्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. नारायणला प्रमाणापेक्षा जास्त ॲनेस्थेशीया दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. पोलिसांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.