वाघोली – आव्हाळवाडी तालुका हवेली येथील महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा भाजप कार्यकारिणीचे सदस्य गणेश कुटे यांच्या दोन्ही मुली प्राची कुटे आणि श्रुती कुटे गेल्या सात वर्षापासून आपल्या भागातील वृक्षांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करीत आहेत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पर्यावरणाची रक्षण करण्याच्या हेतूने तसेच झाडांचे महत्त्व जाणून वृक्षांना राखी बांधून वृक्षांबद्दलचे बंधुत्व निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्राची कुटे हिने सांगितले. या उपक्रमाबद्दल कविता कुटे, सरुबाई कुटे, भगवान कुटे, वनिता कुटे,अर्चना कुटे, नलिनी कुसमाडे, शोभा गव्हाणे, सविता कुटे, मोनिका गायकवाड, स्वनाली जवळकर आदींनी अभिनंदन केले आहे.