वाघोली – वाघोली ते तळेगाव दाभाडे परिसरातील क्रेशर मालकांनी एकत्र येऊन वाघेश्वर स्टोन क्रेशर संस्थेची स्थापना केली असून यापुढील काळात या संस्थेमार्फत एकच दर पत्रक ठरवले असून याच परिपत्रकानुसार संस्थेच्या माध्यमातून मालाची विक्री होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव रामदास दाभाडे यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष रामदास काकडे, खजिनदार योगेश ससाने व सर्व सदस्यांचे उपस्थितीत जवळपास शंभर स्टोन क्रशर मालकांनी एकत्र येऊन वाघेश्वर स्टोन क्रशर संस्थेची स्थापना केली असून एक सप्टेंबर पासून नागरिकांना योग्य दरात उत्तम दर्जाचा माल पोचवण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
वाघोली पासून कोलवडी, मांजरी, पेरणे फाटा, लोणीकंद, केसनंद, फुलगाव, तुळापूर, लोहगाव, विमान नगर, विश्रांतवाडी, धानोरी, अष्टापुर, खडकी, कोरेगाव-भीमा चंदन नगर, खराडी, वडगाव शेरी, भोसरी, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, तळेगाव दाभाडे, हडपसर, कोंढवा, वानवडी, पिंपरी-चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, भुकूम, हिंजवडी, केंदूर, राहू, वाकड, काळेवाडी, चाकण, खेड, मंचर आदी जिल्ह्यातील भागात माल पोचवण्याचे दर पत्रक संस्थेच्यावतीने निश्चित करण्यात आले आहे.