वाघोली – आव्हाळवाडी तालुका हवेली येथे मागील दोन वर्षांमध्ये कोरोना च्या काळात स्वतःच्या जीवाचीही परवा न करता ज्या लोकांनी गावासाठी काम केले त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी राजाराम रतन कुटे,आरोग्य अधिकारी फड मॅडम, लता पवार, लता देवकुळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी हवेली पंचायत समितीचे सभापती नारायणराव आव्हाळे, आव्हाळवाडी गावच्या सरपंच ललिता चंद्रकांत आव्हाळे, उपसरपंच राहुल सातव पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवा आव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम कुटे, ग्रामपंचायत सदस्य अतुल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य उषाताई सातव, राजकन्या आव्हाळे, अनिताताई आव्हाळे, माजी उपसरपंच संदेश शेठ आव्हाळे, माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे, उद्योगपती सागर आप्पा आव्हाळे, पोलीस पाटील उमेश आव्हाळे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष तुकाराम आव्हाळे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय आव्हाळे, खंडोबा उत्सव कमिटीचे खजिनदार नवनाथ पांडुरंग सातव, माजी सरपंच राजेंद्र आव्हाळे, सुनील सातव, राहुल कुटे, नितीन कुटे, दत्तात्रेय नानाभाऊ आव्हाळे, ग्राम विकास अधिकारी मुठेकर साहेब आदी उपस्थित होते.
“आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा यथोचित सन्मान करून covid-19 च्या काळात केलेल्या मदतीतून ऋणाईत होण्याचा प्रयत्न प्रत्येक ग्रामस्थांनी करावा.”
– शरद आव्हाळे ग्रामपंचायत सदस्य, आव्हाळवाडी