Parag Desai Passes Away : वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) ब्रँडसाठी प्रसिद्ध गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड (Gujarat Tea Processors & Packers Ltd.) चे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी अहमदाबादमधील खाजगी रुग्णालयात वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पराग देसाई यांचा नुकताच अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पराग देसाई(Parag Desai) अहमदाबादमधील त्यांच्या घराजवळ इस्कॉन अंबली रोडवर सकाळी वॉकसाठी गेले होते, यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. ज्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना उपचारांसाठी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर (Parag Desai) शस्त्रक्रिया करण्यात अली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली यामुळे त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते.
देसाई (Parag Desai) यांच्या कुटुंबियांनी सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू आधी त्यांना सात दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
पराग देसाई (Parag Desai) हे वाघ बकरी चहा कंपनीत कार्यकारी संचालक पदावर होते. त्यांनी अमेरिकेच्या लाँग आयलँड विद्यापीठातून एमबीए केले होते. ते चहा समूहाचे चौथ्या पिढीतील उद्योजक होते. समूहाच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाचे नेतृत्व करण्याबरोबरच त्यांनी ब्रँडला नवीन उंचीवर नेले.
पराग देसाई (Parag Desai) 1995 मध्ये वाघ बकरी चहामध्ये रुजू झाले. त्यावेळी कंपनीची एकूण उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा कमी होती. पण आज वार्षिक उलाढाल 2,000 कोटींच्या पुढे गेली आहे. वाघ बकरी चहा भारतातील 24 राज्यांमध्ये तसेच जगातील 60 देशांमध्ये निर्यात केला जातो.