काऱ्हाटी, (वार्ताहर)- जळगाव सुपे (ता. बारामती) येथे नेहरू युवा केंद्र पुणे (युवक कार्यक्रमाचे व खेल मंत्रालय भारत सरकार) बारामती तालुका यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला
मतदान का केले पाहिजे. मतदान हा आपला का अधिकार आहे. अशा मतदान जनजागृतीपर अनेक विषयांवर ग्रामसेविका दीपाली हिरवे, तलाठी भाऊसाहेब भागवत यांनी विचार मांडले.
याप्रसंगी मुख्याध्यापक महेश कुमार शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुन्नाबी मुजावर, स्वाती जगताप, सामाजिक कार्यकर्ते संतोष जगताप, योगेश जगताप, पांचाळ सर, कोळेकर सर, कोकाटे सर, खोमणे मॅडम, कोकाटे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक नेहरू युवा केंद्राचे बारामती तालुका प्रतिनिधी वैभव भापकार यांनी आभार मानले.