काऱ्हाटी, (वार्ताहर)- जळगाव (ता. बारामती) येथे सर्व रोग निदान शिबिरास प्रतिसाद मिळाला. यावेळी उज्ज्वल आरोग्य सेवा प्रतिष्ठान व ग्रामपंचायत जळगाव, सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, मल्हार चाईल्ड डेंटल हॉस्पिटल इन लॅक बुधरानी हॉस्पिटल, यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचत्य साधून सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी कान, नाक, घसा, दंतरोग, बाळरोग निदान, हृदय, मधुमेह, ईसीजी तपासण्या करण्यात आल्या यावेळी डॉ. सूरज पाताडे, डॉ. प्रीती सोनवणे, डॉ. प्रशांत सोनवणे डॉ. सोनाली सोनवणे डॉ. बाळासाहेब सोनवणे डॉ .विनया सोनवणे उपस्थित होते.
याप्रसंगी उज्वल आरोग्य संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ जगताप, सरपंच मनीषा खोमणे, कौशल्या खोमणे, ग्रामसेवक दीपाली हिरवे, मुन्ना बी मुजावर, अंजन खोमणे, सुरेखा जगताप, स्मिता जगताप, दीपाली बंडगर, राधेश्याम खोमणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.