हीच वेळ आहे तुमचा आवाज विधानसभेत पोहचवायची

राज ठाकरेंचे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मतदारांना साकडे

मुंबई – सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही रिंगणात उतरली असून, संपूर्ण राज्यभर प्रचाराची राळ उडवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहे. या प्रचारसभांमधून त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडली.

दरम्यान, प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असतानाच, राज ठाकरे यांनी ट्विटर अकाऊंटवरून एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. राज यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना एका साद घातली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.