दिवाळीपूर्व पगाराची घोषणा करणारं फसवणीस सरकार- राष्ट्रवादी काँग्रेस

सरकारच्या तिजोरीत पैसे नसताना दिली खोटी आश्वासने…

मुंबई: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा यंदा दिवाळीपूर्व पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. कर्मचाऱ्यांना वेतन २४ ऑक्टोबरपूर्वी देऊ, असा शब्द फडणवीस सरकारने दिला होता. पण सरकार कितीही खोटे दावे करत असली तरी आर्थिक मंदीमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

सरकारवर हा निर्णय रद्द करण्याची नामुष्की ओठवली. पण याविरोधात कर्मचाऱ्यांचा रोष पत्करावा लागल्यावर आता श्रीमंत संस्था आणि रिझर्व्ह बँकेकडून उधार घेऊन कर्मचाऱ्यांचे वेतन करू, असे एका वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. पण हे शक्य न झाल्यास दिवाळीपूर्व पगार या सरकारच्या निव्वळ भूलथापा ठरणार आहेत. सरकारच्या तिजोरीत पैसे नसताना फडणवीस सरकारने खोटी आश्वासने दिली आणि आता कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पाडत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीने केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.