घड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत ? निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा

सातारा: सोमवारी राज्यभर विधानसभेसाठी मतदान झाले. काही अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभा पोटनिवडणुकीचेही मतदान पार पडले. हे मतदान पार पडत असताना खटाव तालुक्यातील नवलेवाडी या मतदारसंघात घड्याळा समोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याची माहिती समोर आली होती. परंतु या संपूर्ण प्रकरणात काही तथ्य नसून अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती नलावडे यांनी दिलं आहे.

कोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मॉक ड्रीलवेळी ईव्हीएम चांगले होते. मात्र, सकाळी 10-11 वाजण्याच्या सुमारास ईव्हीएममध्ये घडाळ्याचे बटन दाबले असता कमळाला मत जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, यामागची माहिती जाणून घेतली असता खरे सत्य समोर आले.

सकाळी 10 च्या सुमारास या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला. यामुळे मतदान करताना एरर दाखवू लागले. वरचे किंवा खालच्या बाजुचे कुठलेही बटन दाबले जात असता ते दाबलेच जात नव्हते. याबाबतची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकाराची माहिती राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना लागली. ईव्हीएममध्ये बिघाड की कमळाला मतदान होते याची चाचपणीही त्यांनी केली आणि त्यांनतर खरा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणाची माहिती समजल्यावर शिंदे यांच्या मुलाने मतदान केंद्रावर जाऊन मशीनची पाहणी केली होती. यावेळी कोणतेच बटन दाबले जात नसल्याचे दिसून आले. शेवटी हे मशीन त्यांच्यासमोरच रिस्टार्ट करण्यात आले आणि मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. यामुळे या मशीनच्या बिघाडाची किंवा तक्रारीची कोणतीच नोंद झाली नाही. मात्र, सकाळपर्यंत घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची अफवा राज्यभरात पसरली होती.

जाणून घ्या काय होता प्रकार

घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत

Leave A Reply

Your email address will not be published.