“नशीब बलात्कारासारखं असतं. त्याला रोखू शकत नसाल, तर आनंद घ्या”

केरळ : केरळ मधील काँग्रेसचे खासदार हिबी एडन यांनी एक फेसबुक पोस्ट लिहली होती. काही वेळानंतर ती डिलीट देखील केली परंतु काही वेळातच ती पोस्ट सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाली आहे. त्यामुले या पोस्ट वरून नवीन वादाला तोंड फुटलेलं पाहायला मिळतंय.

हिबी एडन यांच्या पत्नी अन्ना यांनी दोन फोटो पोस्ट करत “नशीब बलात्कारासारखं असतं. त्याला रोखू शकत नसाल, तर त्याचा आनंद घ्या” असा मजकूर लिहला होता. त्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पोस्टवरून वाद निवर्मन झाल्याचे समजताच अन्ना एडन यांनी ती पोस्ट डिलीट केली करत माफी मागितली आहे.

Related Posts

मंगळवारी सकाळी अन्ना लिंडा एडन यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यासोबत त्यांनी पती हिबी ईडन यांचा फोटोदेखील शेअर केला. ‘नशीब बलात्कारासारखं असतं. त्याला रोखू शकत नसाल, तर त्याचा आनंद घ्या,’ असं शीर्षक त्यांनी फोटो आणि व्हिडीओला दिलं होतं.

सध्या कोच्चीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोच्ची शहराचा बराचसा भाग पाण्याखाली आहे. अन्ना एडन यांची पोस्ट पावसाशी संबंधित असल्याचं अनेकांना वाटत आहे. एडन यांनी शेअर केलेला एक फोटो कोच्चीतील पूर परिस्थिती दाखवणारा आहे. एडन यांनी फोटो पोस्ट करून कोच्चीतील पुराचा खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.