मुंबई -द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मंगळवारी कायदेशीर नोटीस बजावली. चित्रपटाच्या बदनामीबद्दल संबंधित पाऊल उचलल्याचे त्यांनी नमूद केले. मागील काही दिवसांपासून वादंगाचे कारण बनलेल्या द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंगालमध्ये बंदी घालण्याची घोषणा ममतांनी सोमवारी केली.
#WATCH | Yesterday Mamata Banerjee said that ‘The Kashmir Files’ and my upcoming film which is based on the genocide in Bengal, are propaganda. She said that BJP funds me for the films I make. We have sent a legal notice to CM Mamata Banerjee against the statements she made:… pic.twitter.com/JXGFVRoytT
— ANI (@ANI) May 9, 2023
त्यावेळी त्यांनी द काश्मीर फाईल्सचा उल्लेख केला. तो चित्रपट समाजातील एका घटकाची मानहानी करण्यासाठी बनवण्यात आला, अशी टिप्पणी ममतांनी केली होती. आणि आता हाच धागा पकडून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली असून, नेटकऱ्यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली आहे.
BREAKING:
I have, alongwith @AbhishekOfficl & Pallavi Joshi, sent a LEGAL NOTICE to the Chief Minister, Bengal @MamataOfficial for her false & highly defamatory statements made with malafide intention to defame us & our films #TheKashmirFiles & upcoming 2024 film #TheDelhiFiles. pic.twitter.com/G2SjX67UOB
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 9, 2023