मुंबई – भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही प्रचंड भरात आहे. सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी कोहली तब्बल 8.9 कोटी रुपये इतके प्रचंड मानधन आकारतो. भारतीय संघात सध्या असलेल्या अन्य कोणत्याही खेळाडूपेक्षा कोहलीची कमाई सर्वात जास्त आहे.
त्याचे फॉलोअर्सही सर्वात जास्त आहेत. केवळ जाहिरातींतील उत्पन्न पाहता त्याची एका दिवसाची कमाई जवळपास सहा लाख रुपयांच्या घरात आहे. सोशल मीडियावर कार्यरत झाल्यापासून कोहलीची नेटवर्थ 1 हजार 50 कोटी रुपये इतकी मोठी आहे.
सध्या कोणतीही मालिका सुरू नसल्याने कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासह इंग्लंडमध्ये आहे. तेथून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केल्यास त्याला सर्वसाधारणपणे अडीच कोटी रुपये मिळतात.