नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा दृष्टिकोन मला भावतो. त्याचा सामन्याकडे पाहण्याचा हाच दृष्टिकोन अन् क्रिकेटपटू व कोहली यांच्यातील फरक स्पष्ट करतो, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉने कौतुक केले आहे.
भारतीय संघातील खेळाडूंमध्ये कोहलीच्या याच दृष्टिकोनाने आत्मविश्वास उंचावतो. कोहलीच्या नेतृत्वातही एक वेगळेपण आहे. मैदानावर तो आक्रमक वाटतो पण निर्णय घेताना मात्र, तो अत्यंत संयमाने व हुशारीने घेतो. त्याच्या याच गुणांमुळे तो सध्याच्या काळातील हिरो ठरतो, असेही वॉ म्हणाला.