पोर्ट ऑफ स्पेन – कर्णधार विराट कोहलीने धडाकेबाज शतक टोलवित भारताच्या विजयाचा पाया रचल्यानंतर वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमारने चार विकेट्स घेत त्यावर कळस चढविला. त्यामुळेच त्यांनी वेस्ट इंडिजविरूद्धचा दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामना 59 धावांनी जिंकला. तर याच सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
कोहलीची विक्रमी कामगिरी :
1)कोहलीने 120 धावा करताना वन-डे मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्यामध्ये दुसरे स्थान घेतले. त्याच्या आता 11 हजार 406 धावा झाल्या आहेत. सौरव गांगुली (11 हजार 363 धावा) यांना मागे टाकत त्याने हे स्थान घेतले. सचिन तेडुलकरने 18 हजार 426 धावा करीत अव्वल स्थान मिळविले आहे.
2) वन-डे मध्ये प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध सर्वात वेगवान 2 हजार धावा करण्याचाही विक्रम त्याने केला. त्याने 33 सामन्यांमध्ये ही कामगिरी करताना रोहित शर्मा याचा 37 सामन्यांमध्ये 2 हजार धावा केल्या होत्या. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध हा पराक्रम केला होता. कोहलीने विंडीजविरूद्ध हे यश मिळविले.
3) कोहलीचे विंडीजविरूद्ध वन-डेमधील सातवे तर एकूणातील 42 वे शतक आहे.
4) विंडीजविरूद्ध एक दिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा जावेद मियॉंदादचा 26 वर्षांपूर्वीचा विक्रमही कोहलीने मोडला. मियॉंदादने 64 सामन्यांमध्ये 1930 धावा केल्या होत्या. कोहलीने 34 सामन्यांमध्ये 2031 धावा केल्या आहेत.