लखिसराई – बिहारच्या लखिसराई येथील अशोकधाम मंदिरात आज दर्शनासाठी भाविकांची एकच झुंबड उडाल्याने तेथे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली त्यात एक जण मरण पावला तर र्आठ जण जखमी झाले आहेत.
श्रावणी सोमवार निमीत्त तेथे आज हीं गर्दी झाली होती. त्यावर आवर घालणे मंदिर प्रशासनाला जमले नाही. तथापि जादा बंदोबस्त मागवून तेथील स्थिती नियंत्रणाखाली आणण्यात आली. जखमींना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.
यापैकी कोणाच्याहीं अंगावर कोणत्याहीं जखमी नाहीत. त्यामुळे गर्दीच्या घुसमटीमुळे ते अस्वस्थ झाले असावेत असा कयास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यात मरण पावलेल्या साठ वर्षीय इसमाचाहीं यात गुदमरून मृत्यू झाला.