काबुल – अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने देशभर कर्जमाफी जाहीर करून टाकली आहे. तसेच देशभरातील महिलांना सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन देखील केले आहे.
देशभरात निर्माण झालेला तणाव शांत करण्याचा हा प्रयत्न आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य असलेल्या इनामुल्लाह समानगनी याने ही माहिती दिली. देशातील प्रांतीय पातळीवरील प्रशासनाच्या बाबतीत तालिबानकडून करण्यात आलेले हे पहिले वक्तव्य आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबाननं ताबा मिळवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. विशेषत: अफगाणिस्तानमधील महिलांणध्ये याविषयी अधिक भीती असल्याचं दिसू आलं.
मात्र महिलांप्रती तालिबानची भूमिका सौम्य झाली आहे. आता महिलांना सरकारमध्ये सहभागी करून घेतले जाईल, असे समानगनी याने सांगितले. अफगाणिस्तानच्या नवीन सरकारचे स्वरुप नक्की कसे असेल हे अद्याप निश्चित नाही.
मात्र सरकारमध्ये पूर्ण इस्लामी नेते असतील आणि सरकारमध्ये सर्व गटांनी सहभागी व्हावे. आमचे लोक मुसलमान आहेत आणि आम्ही त्यांना इस्लामची सक्ती करायला इथे आलो नाही, असेही त्याने सांगितले. मात्र सरकारचा तपशील त्याने जाहीर केला नाही.
यातच तेथील परिस्थिती दर्शवणारे अनेक फोटो सोशलवर व्हायरल झाले आहे. यात एक अमेरिकन टीव्ही रिपोर्टरचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हि सीएनएन टीव्ही रिपोर्टर असून हिचे नाव क्लेरिसा वॉर्ड आहे.
क्लेरिसा वॉर्ड या २०१९ मध्ये त्या पहिल्या अशा वेस्टर्न रिपोर्टर बनल्या होत्या ज्यांनी अफगाणिस्तानाती तालिबान शासित क्षेत्रातून रिपोर्टिंग केलं होतं. तेव्हा त्या वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसून आल्या आहे. तर सद्यस्थिती अफगाणिस्थानमध्ये त्या मुस्लीम महिलांच्या वेशभूशा परिधान करून त्या रिपोर्टींग करतांना दिसत आहे.
तालिबाननं मिळवलेल्या ताब्यानंतर २४ तासांतच त्यांची वेशभूषा बदलली असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. परंतु यासंदर्भात खुद्द क्लेरिसा यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी तालिबानच्या काही मुख्य लोकांच्याही मुलाखती केल्या होत्या.