पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापलिका हद्दितील 54 हजार 450 विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली असून यातील 8 हजार 257 विद्यार्थ्यांनी अर्जाच्या भाग-2 मध्ये प्राधान्य क्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी केली आहे.
अकरावी प्रवेशासाठी 16 ऑगस्टपासून नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्यासी ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दितील 298 कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून यात 1 लाख 6 हजार 645 जागा उपलब्ध आहेत.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. अर्जाचा भाग-2 भरण्यासाठीही सुविधा सुरू झाली असून त्यासाठी 22 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या 38 हजार 418 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉकही केले आहेत. 33 हजार 361 अर्जांची पडताळणीही पूर्ण झालेली आहे.