पुणे – येरवडा परिसरामध्ये खुनी हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या टोळीचा म्होरक्या प्रफुल्ल उर्फ गुंड्या कसबे यांच्यासह 13 जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. शहरातील या वर्षातील अशी 47 वी कारवाई आहे.
कसबे व त्याच्या साथिदाराविरुद्ध खुनी हल्ले, मारामाऱ्या, लुटमारीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यासह अशितोष अडागळे, शिवराज मिरगळ, तेजस दनाने, विवेक उर्फ शुभम सिंग, कुणाला उर्फ सोनबा चांदणे, संदीप घोडेस्वार, रोहीत उर्फ विनायक भोंडे, दीपक मदने, करण सोनवणे, महेश कांबळे, अजय कसबे, अनिकेत कसबे आणि महेश सरवदे (सर्व रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांच्याविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली. येरवडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता.