Vinod patil Lok sabha elction 2024 : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलाच तापलेलं आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देऊ केल्यानंतर देखील मनोज जरांगे यांनी माघार घेतलेली नाही. अशात आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पाटील यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचा सूतोवाच केला आहे.
आरक्षणासाठी मराठा समाजाचे मोर्चे ज्यावेळी निघाले त्यावेळी देखील विनोद पाटील आरक्षणाच्या लढ्यामध्ये अग्रेसर होते. आता स्वतः पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मतदारसंघ आणि पक्षाबाबत देखील भाष्य केले. | Vinod patil Loksabha elction 2024
आगामी लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगर या मतदार संघातून लढणार असल्याचं विनोद पाटील यांनी जाहीर केलं आहे. विनोद पाटील यांनी आग्रा येथे शिवजयंती साजरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुक लढवण्याचा आग्रह धरला होता. लोकांच्या आग्रहाखातर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं विनोद पाटील यांनी स्पष्ट केलं.याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने प्रसारित केले आहे. | Vinod patil Loksabha elction 2024
अजून माझं कोणत्याही पक्षाशी बोलणं झालेलं नाही.कार्यकर्ते म्हणतील त्या पक्षासोबत लढेल.. मराठा मावळ्यांनी अपक्ष सांगितल्यास अपक्ष लढेल.समाजाचा प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेत जायचं असल्याचं देखील पाटील यांनी यावेळी सांगितले. | Vinod patil Loksabha elction 2024
विनोद पाटीलांकडून मराठा आरक्षणासाठी आधीच कॅव्हेट
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर आधीच मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल केलेली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतेही निर्देश देण्याआधी समाजाचे म्हणने ऐकून घेण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.