सासवड – बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून उभे राहण्याची पूर्ण तयारी केली होती; परंतु माझ्या उमेदवारीमुळे 10 ते 12 जागा धोक्यात येत होत्या, अशा आशयाचा फोन मला मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा फोन आल्या नंतर मी कोणताही विचार न करता युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. यामुळे विजय शिवतारे यांनी आपली तलवार आता म्यान केल्याची चर्चा पुरंदरमध्ये रंगू लागली आहे.
सासवड (ता पुरंदर) येथे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिवतारे बोलत होते. ते म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्या बरोबरच भोरमधील वाजेघर, वांगणे, शिवगंगा या खोर्यातील योजनेसाठी 1782 कोटी रुपयांची सुधारित प्रकल्प मान्यता आचारसंहितेनंतर मिळणार आहे. त्याचबरोबर विमानतळ, राष्ट्रीय बाजार, पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी 58 कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची मागणी मान्य केली असल्याचे शिवतारे यांनी यावेळी सांगितले.
दोन वर्षांत पाणी आले पाहिजे तिघांनी मान्य केले आहे. विमानतळासाठी स्वेच्छा खरेदी रेट जाहीर करा. पैशाची सरकारने तरतूद करावी. शेतकरी यांच्यावर स्वइच्छा जमिनी दिल्या तर घ्याव्यात. आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, अशी मागणी मुख्यमंत्रे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 5 लाख 50 हजार पावर विरोधी असणार्या मतदानासाठी आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठका घेऊन ते मतदान पॉझिटिव्ह कसे करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर त्यावेळी दोन्ही पवार हे विरोधात होते आता एक पवार हे युतीमध्ये आहेत.
पुरंदरमधून उमेदवाराला 50 हजारांचे लिड देणार
मी यापूर्वीच अजित पवारांना माफ केले असून त्यांनी आता माफी मागण्याची गरज नाही. त्यांना काय बोलायचे ते त्यांनी पालखीतळावर येऊन ठरवावे कदाचित पुढच्या लोकसभेला माझा विचार होऊ शकतो अनंतराव थोपटे हे महाविकास आघाडीचे काम करीत असून त्यांचे ते काम करतील. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून युतीच्या उमेदवाराला 50 हजारांची आघाडी देऊ, असे आश्वासन यावेळी शिवतारे यांनी दिले.