साऊथचा अर्जुन रेड्डी त्याच्या फेव्हरिट हिरोईन रश्मिकाप्रमाणे बॉलीवूडमध्ये दाखल होतो आहे. अर्जुन रेड्डी म्हणजे विजय देवरकोंडा. अर्जुन रेड्डीचा जो रिमेक बॉलीवूडमध्ये झाला त्याने शाहीद कपूरला पुन्हा स्टारडम मिळवून दिले. मूळ चित्रपटात विजयने कमाल केली होती. त्याचा लायगर हा चित्रपट हिंदीत येतो आहे.
त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. मध्यंतरी एक बातमी आली. त्यात लायगर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो आहे, असा दावा करण्यात आला. या चित्रपटाच्या सॅटेलाइट राइटस्साठी 200 कोटीरुपये मोजण्याती तयारी एका कंपनीने केली असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. याबाबत विजयला विचारणा केली असता त्याने थेट आणि स्पष्ट शब्दांत या बातमीचा इन्कार केला आहे.
विजय म्हणतो की ही बातमी चुकीची असून त्यापेक्षा कैकपटीने जास्त पैसे आम्ही हा चित्रपट थिएटरला रिलीज करून कमावू शकतो. लायगरचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथने केले असून या चित्रपटाची अत्यंत आतुरतेने वाट पाहिली जात आहे. तेलगु आणि हिंदी या दोन्ही भाषांत हा चित्रपट केला जात असून हिंदी आवृत्तीचे अधिकार धर्मा प्रोडक्शन अर्थात करण जोहरकडे आहेत.
या चित्रपटात राम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्याही भूमिका आहेत. तमिळ, कन्नड, मल्याळम अशा भाषांतही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे विजय देवरकोंडा संपूर्ण भारतात स्टार म्हणून उदयाला येत असल्याचे मानले जाते आहे.