नवी दिल्ली :- दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र आणि उद्योगपती मनोज कुमार जयस्वाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
त्यांना कोळसा खाण परवाना गैरव्यवहार प्रकरणी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. या प्रकरणातील आरोपींनी आपल्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर न्यायालयाने सीबीआयला नोटीस जारी करून त्यांचे म्हणणे मागवले आहे.
ट्रायल कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर दर्डा व जयस्वाल यांना लगेच ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सीबीआयने विरोध दर्शवला आहे.
या प्रकरणी ते सविस्तर उत्तर दाखल करणार आहेत. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.