बंगळुरू : पाच वर्षांचं तान्हुलं… दोन दिवसांसाठी आजोळी आलं अन् दिल्लीतच अडकून पडलं… आई अन लेकराची ही ताटातूट विमान सेवा सुरू होताच संपली… हे पाच वर्षाचं लेकरू बंगळुरू विमानतळाबर आईला बिलगलं अन् साऱ्यांच्याच डोळ्यात आंदाचे दोन अश्रू तरळले… हा हवाई प्रवास या लहानग्याने एकट्याने केला हे आणखी एक विशेष.
पाच वर्षाचा विहान शर्मा दिल्लीहून एकटाच विमानातून आला. केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची आई डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पहात होती. विशेष बाब म्हणून या लहानग्या विहानला प्रवासाची खास परवानगी देण्यात आली.
मार्च अखेरीनंतर देशांतर्गत विमानसेवा सोमवारी सुरू झाली. करोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आला आणि देशांतर्गत विमानसेवा थांबवण्यात आली होती.