नगर -लॉकडाऊनमध्ये ही अनेक शाळांचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु झाला आहे. मुलांना शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षण घेण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी पद्मशाली युवा शक्ती ट्रस्ट व पद्मनादम ढोल ताशा ध्वज पथकाच्या वतीने 200 डझन वह्यांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती पद्मशाली युवा शक्तीचे पदाधिकारी अजय म्याना यांनी दिली.
या उपक्रमा अंतर्गत शहरातील शिवाजीनगर, दातरंगे मळा, स्टेशन रोड, तोफखाना, चितळे रोड, श्रमिकनगर, पाईपलाईन रोड, नित्यसेवा अशा विविध भागात वह्यांचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी दीपक गुंडू म्हणाले, दरवर्षी पद्मशाली युवा शक्ती ट्रस्ट मार्फत 100 डझन वह्या चे वाटप शहरातील गरजू विद्यार्थ्यांना केले जात होते. परंतु ह्या वर्षी नागरिकांच्या अडचणीत वाढ झाल्याने 200 डझन वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमित इप्पल्पेल्ली, योगेश म्याकल, योगेश ताटी, सागर बोगा, शुभम बुरा, श्रीनिवास इप्पल्पेल्ली, सागर आरकल, आनंद गुंटूक, शुभम येगुंपटला, गणेश कोंडा, शुभम बोल्ली, नरेश कोटा, सागर मेहसुनी, राजू म्याना, योगेश ताटी यांनी सहकार्य केले.