Mumbai Weather: मुंबईत अनेक भागात दुपारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु आहे. घाटकोपर येथील पंत नगर भागातील पेट्रोल पंपावर आज मोठा अपघात झाला. येथे मुसळधार पाऊस व वादळामुळे मोठे होर्डिंग व शेड कोसळले. या अपघातात 35 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 70 ते 80 गाड्या या बॅनरखाली अडकल्या होत्या. दुसरीकडे, खराब हवामानामुळे मुंबईतील विमानसेवांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे काही काळ बंद ठेवली होती.
Over 35 people injured and 100+ likely trapped after giant hoarding collapses in Chheda Nagar of Ghatkopar East in Mumbai amid heavy rains and dust storm. Rescue work is presently underway. https://t.co/E4Pi0w7V2L pic.twitter.com/W1NMaWYO1H
— Politicspedia ( मोदी जी का परिवार ) (@Politicspedia23) May 13, 2024
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर, वडाळा, भायखळा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह वरुणराजा काही वेळासाठी आला अन् काही ठिकाणी थरकाप उडवून गेला, अशी परिस्थिती वादळी वाऱ्यानंतर निर्माण झाली होती. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम झाला. मुंबई मेट्रो, मध्य रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. तर विमानसेवेची धावपट्टी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली होती.
Duststorm & Rain Alert with gusty winds :
Next 3 hrs for mumbai Rain at some places with lightning, gale force winds possible Stay tune for updates Be Indoor stay safe in homes please.#MumbaiRains pic.twitter.com/R0FBc4SE8h
— Maharashtra Weather महाराष्ट्र हवामान अंदाज🌥️🌩️☀ (@Weather_MH) May 13, 2024
#WATCH | A tall metal structure standing opposite a building collapses due to a strong storm in the Wadala area of Maharashtra
(Viral video, confirmed by officials) pic.twitter.com/OM20Bu4PYw
— ANI (@ANI) May 13, 2024
वडाळ्यात टॉवर कोसळला –
वादळी वाऱ्याच्या जोरामुळे वडाळा परिसरात टॉवर कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अडकलेल्या दोन ते तीन जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. टॉवरखाली अडकलेल्या 4 ते 5 चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. टॉवर दुर्घनटेनंतर अग्निशमन दलाने लगेचच घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, या दुर्घटनेत एक जण जखमी झाला असून गाडीतून काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आला.
#WATCH | A tree was uprooted due to strong wind in the Jogeshwari Meghwadi Naka area of Mumbai.
One person was injured while the autorickshaw was damaged.
(Viral video confirmed by official) pic.twitter.com/P4H9amHiVJ
— ANI (@ANI) May 13, 2024
दरम्यान इतर ठिकाणीही झाडपडी यांसारख्या घटना घडल्या आहेत. जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी नाका शाखेजवळील मोठे माडाचे झाड कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे या झाडाखालीच काही लहान मुले खेळत होती. मात्र, सुदैवाने घटना घडण्यापूर्वीच ते तेथून निघाल्याने अनर्थ टळला. चर्चगेट परिसराला वाळवंटाचं स्वरुप प्राप्त झालं होतं. येथील ओवल मैदान , हाई कोर्ट , सेशन कोर्ट , मुंबई यूनिव्हर्सिटी राजाबाई टॉवर परिसरही धुळीत अडकला होता.
Can’t beat smell of first #MumbaiRains of the season. #Petrichor pic.twitter.com/l0u2QrMd74
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) May 13, 2024
वाहतूक सेवा विस्कळीत –
पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा मुंबईतील रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम पाहायला मिळाला. मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तर, मध्य रेल्वेची सेवा काही काळासाठी बंद पडली होती. मुंबई मेट्रोही घाटकोपर मार्गावर ठप्प झाली होती. तर, विमानवाहतूकही वळवण्यात आली होती. आता, वाहतूक सुरू झाली असून सर्वकाही पूर्वपदावर येत आहे.
Ohhh No. Not again..
Just received a forward on WA group from US resident, with caption “Sudden Furious ThunderStorm Hits Mumbai”
Arrey re… this the famous Coconut Tree Dance of 2020😂#WhatsappUniversity#MumbaiRains#DustStorm pic.twitter.com/skmD7Qgz1P
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) May 13, 2024
नवी मुंबईतील ऐरोली परिसरात हायटेन्शन वीज वाहिनीच्या टॅावरवर स्पार्कींग होऊ आग लागल्याची घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे येथील टॅावरने पेट घेतला. त्यामुळे, ऐरोली,दिघा परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतील वीजपुरवठाही खंडीत झाला असून कल्याण, टिटवाळा, डोंबिवली मध्ये 3 तासांपासून वीजपुरवठा बंद आहे.
वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरात पूर्व द्रूतगती महामार्गावर घाटकोपरमधून मुलुंडच्या दिशेने जाणारा मार्गावर ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घाटकोपर रमाबाई नगर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील इतर ठिकाणीही वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम पहायला मिळाला.
Attention Mumbai ! good news is on the way… wait is over for you Imd predicts Thundershowers in next 24 hrs & 48 hrs also & it can feels Some relief from warm humidity
👇🏻 Here’s report of #MumbaiWeather pic.twitter.com/zW90PCNLG5
— Maharashtra Weather महाराष्ट्र हवामान अंदाज🌥️🌩️☀ (@Weather_MH) May 13, 2024