IPL 2024 (KKR vs GT Match 63) : खराब हवामानामुळे टॉसला विलंब, चाहत्यांची होऊ शकते निराशा…

IPL 2024 (KKR vs GT Match 63, Toss update) : आज IPL 2024 च्या 63 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. गेल्या सामन्यात गुजरातने चेन्नईवर मोठा विजय मिळवला होता. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी आजचा सामनाही जिंकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोलकाता संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. मात्र, संघ आपले उर्वरित साखळी सामने जिंकून अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल.
सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 वाजता सुरुवात होणं अपेक्षित आहे. तर 7 वाजता टॉस होणार होता. मात्र खराब हवामानामुळे टॉसला विलंब होत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची टॉससाठीची प्रतिक्षा वाढली आहे. अहमदाबादमध्ये खराब हवामानासह तिथे हलका पाऊस पडत आहे. यामुळे मैदान आणि खेळपट्टी कव्हरने झाकली गेली आहे. खेळाडू आणि चाहते स्टेडियमवर पोहोचले आहेत. काही वेळाने पाऊस थांबून सामना सुरू होण्याची शक्यता आहे. गुजरातसाठी हा करो या मरो असा सामना आहे. सामना रद्द झाल्यास गुजरातचे मोठे नुकसान होईल आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. त्यांना कोणत्याही किंमतीत दोन गुण हवे आहेत आणि त्यानंतर त्यांना इतर संघांवरही अवलंबून राहावे लागेल.
So which snacks go best in this weather, Amdavad? 🌫 pic.twitter.com/M6JUfkYrmI
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 13, 2024
कर्णधार शुभमन गिलच्या फॉर्ममध्ये परतल्यामुळे प्रोत्साहित झालेल्या गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. गिलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचे आयपीएलमधील हे चौथे शतक ठरले. त्याच्याशिवाय साई सुदर्शननेही शतक झळकावले होते. गिल आणि सुदर्शन यांनी गेल्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी 210 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ केकेआरविरुद्ध या दोघांची कामगिरी टायटन्ससाठी खूप महत्त्वाची ठरेल.
गुजरातने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 जिंकले आणि 7 सामने गमावले. त्याचे 10 गुण आहेत. येथे कोलकाता 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यासह त्याने प्लेऑफमध्येही स्थान मिळवले. सध्या सात संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. राजस्थान रॉयल्स (16) आणि सनरायझर्स हैदराबाद (14) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्सचे समान 12 गुण आहेत. टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे प्रत्येकी 10 गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. टायटन्सचा निव्वळ धावगती चांगली नाही आणि अशा परिस्थितीत संघाने अंतिम चारमध्ये स्थान मिळवले तर ते चमत्कारापेक्षा कमी नसेल. मात्र, टायटन्स संघ जर-तर समीकरणात कायम राहण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, हे निश्चित.
IPL 2024 Final : विजेतेपदाची लढत कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या, किती असेल सर्वात स्वस्त तिकीट…
आयपीएलमध्ये गुजरात आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत 3 सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने दोनदा तर कोलकाताने एकदा सामना जिंकला. पण यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कोलकाता हा लीगमध्ये प्लेऑफ गाठणारा पहिला संघ आहे, तर गुजरातची प्ले-आॅफमध्ये पोहचण्याची शक्यता कमी आहे.





