नगर -करोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्माचाऱ्यांच्या कार्याला सलाम करत निमा संघटना व अक्षय जीवन प्रतिष्ठानकडून गैरव करण्यात आला.
जिल्ह्यातील कोविड-19 महामारीच्या कार्यात सक्रिय रुग्णसेवेत काम करणाऱ्या 108 रुग्णवाहिका कर्मचारी, पदाधिकारी, आयएसएम डॉक्टर, रुग्णसेवेतील सीएमओ यांचा जिल्हा समन्वय डीएम सुवर्णमाला गोखले, बीव्हीच्या एडीएम कांचन बिडवे, कमांडो डॉ. सुभाष भालसिंग, डॉ. कोल्हे, सीएमओ डॉ. खटके, सुपरवायझर नांगरे, चालक गणेश चव्हाण, दत्ता मेहेत्रे, ईएमएसओ डॉ. विनायक, डॉ. आंधळे, डॉ. गिते, डॉ. बागले, गणेश काळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी निमा महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष डॉ. जी. एस. कुलकर्णी, सचिव डॉ. अनिल बाजारे, डॉ. रवी पाचारणे, नगर शाखेचे डॉ. रवी मिरगणे, अक्षय जीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सुभाष बागले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.