World Olympic Wrestling Qualifiers 2024 : भारतीय कुस्तीपटू ‘अमन सेहरावतने’ मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…

World Olympic Wrestling Qualifiers 2024 – आशियाई चॅम्पियन अमन सेहरावतने तुर्कीमध्ये जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारात भारतासाठी पॅरिस २०२४ चा कोटा मिळवला. तर ही कामगिरी करण्यात दीपक पुनिया अपयशी ठरला. पहिल्या फेरीतच तो बाहेर पडला. भारतासाठी हा सहावा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ कुस्ती कोटा आहे, तर पुरुष विभागातील पहिलाच कोटा आहे. यापूर्वीचे पाचही कोटा भारतीय महिला कुस्तीपटूंनी जिंकले होते.
२३ वर्षांखालील विश्वविजेत्या सेहरावतने उपांत्य फेरीत डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाच्या चोंगसाँग हानचा १२-२ असा पराभव केला. इस्तंबूल येथे होत असलेली ही स्पर्धा कुस्तीपटूंना आगामी ऑलिम्पिक खेळांसाठी कोटा मिळवण्याची शेवटची संधी आहे. प्रत्येक वजन वर्गात तीन कोटा आहेत.
World Olympic Wrestling Qualifiers 2024 : कुस्तीपटू निशा दहियाची ऐतिहासिक कामगिरी….
अमनने आपले दोन्ही सामने सहज जिंकले. प्रथम त्याने जोझी व्हॅलेंटिनोव्हचा १०-४असा पराभव केला. यानंतर अमनने युक्रेनच्या आंद्रे यात्सेन्कोचा पराभव केला. यात्सेन्कोने भारतीय कुस्तीपटूला आव्हान दिले पण अमन खूप मजबूत असल्याचे सिद्ध झाले. प्रतिस्पर्ध्याला ‘टेकडाऊन’ केल्यानंतर अमनने तांत्रिक श्रेष्ठतेने विजय मिळवला. त्याने उत्तर कोरियाच्या चोंगसाँग हानचा १२-२ अशा फरकाने पराभव केला.





