पुणे – शहरात बुधवारी रात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी लोक पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, डेक्कन परिसरातील भिडे पुलावर पाणी येऊनही याठिकाणी पुणेकर जीवघेणा प्रवास करत आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहात शहरातील अनेक भागात शेकडो वाहने देखील वाहून गेले आहेत.