मुंबई – तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नानी सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नानींच्या दसरा या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या आधी नानीचा ‘मक्खी’ हा चित्रपट हिंदीमध्ये देखील रिलीज झाला होता. ज्यामध्ये साऊथ स्टार सुदीप किच्च देखील होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले होते.
नानीचे दसरा या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांमध्ये पुनरागमन होत आहे. मूळतः तेलुगूमध्ये बनलेला हा चित्रपट हिंदीतही मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार असून हिंदी पट्ट्यातही त्याचे प्रमोशन जोरात सुरू आहे.नानीने नुकताच चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत लखनौमध्ये पार पडलेल्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली.
या खास प्रसंगासाठी एक ट्रक तयार करण्यात आला होता, ज्यावर नानीने पोझ दिली. ट्रेलर लाँचच्या भव्यतेबद्दल नानी म्हणाले की, सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक विस्तारला आहे आणि त्यात लोकांचा सहभागही वाढला आहे. उत्तर किंवा दक्षिण विभाग आता संपत आहे. दसरा हा भारतीय प्रेक्षकांसाठी बनलेला चित्रपट आहे.दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले की, हा चित्रपट शक्य तितका रिऍलिस्टिक आणि खरा ठेवण्यात आला आहे. हा एक अॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे. परंतु यामध्ये इमोशन आणि इंटरटमेंट देखील भरपूर आहे.
हा ट्रेलर पाहून अनेकांना पुष्पाची आठवण झाल्याचे टेलरवरील कमेंटवरून समजते. या चित्रपटात नानी धारणी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. ही कथा सिंगरेनी येथील कोळसा खाणींच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सत्ता संघर्षावर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर जोरदार असून यातील अनेक सीन्स लक्षवेधी आहेत.
दसरा आणि अजय देवगणच्या भोलाची हिंदी बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे, जो 30 मार्च रोजी रिलीज होणार आहे. अजय देवगण दिग्दर्शित, भोला हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. हे दोन्हही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्यामुळे प्रेक्षकांना महाऍक्शन पाहायला मिळणार आहे.