Ritesh Deshmukh : बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा रेड सिनेमा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यानंतर आता 2024 मध्ये या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘रेड 2’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर या चित्रपटाबाबत आणखी एक माहिती समोर येणार आहे. अजय देवगणच्या या सिनेमात आता अभिनेता रितेश देशमुखची एन्ट्री होणार आहे.
‘रेड 2’मध्ये रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला. या चित्रपटाद्वारे रितेश आणि अजय आमनेसामने येणार आहे. रितेशने याआधीही काही सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. ‘एक व्हिलन’ आणि ‘मरजावा’ या चित्रपटांत रितेश निगेटिव्ह रोलमध्ये दिसला होता. त्याच्या या भूमिकांनाही चाहत्यांनी पसंती दर्शविली होती. आता पुन्हा एकदा रितेश खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
Get ready for a face-off! Riteish Deshmukh takes on the role of the antagonist in #Raid2.
Welcome, @Riteishd.👏🏻In cinemas on 15th November 2024!@ajaydevgn @Vaaniofficial @rajkumar_rkg #BhushanKumar #KrishanKumar @KumarMangat @AbhishekPathakk @TSeries @PanoramaMovies… pic.twitter.com/Za88Plnbnl
— T-Series (@TSeries) January 12, 2024
‘रेड 2’ हा सिनेमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे या पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आले आहे. ‘रेड 2’ या सिनेमाचे शूटिंग दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई आणि राजस्थानमध्ये होणार आहे. राजकुमार गुप्ता या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
रितेश देशमुखबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2000 साली ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने ‘टोटल धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘हे बेबी’, ‘हमशकल’ सारख्या अनेक चित्रपटात काम केले. कॉमेडी, रोमान्स आणि सकारात्मक भूमिकांसोबतच त्याने नकारात्मक भूमिकांमध्येही आपला ठसा उमटवला आहे.