मुंबई – बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिने केलेल्या पोस्ट आणि फोटो नेहमीच चर्चेत येतात. सोशलवरील युजर्स कधी तिला ट्रोल करतांना दिसतात तर कधी तिचे सोशलवर कौतुकही होतांना दिसते.
View this post on Instagram
यातच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री कंगना राणावतने भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले. तिच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तिच्या या विधानावरून राखीला मोठा मानसिक धक्का बसला असून तिला थेट रूग्णालयात दाखल करावं लागलं.
View this post on Instagram
याबाबत तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. या व्हिडियो मध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसते आहे. तसेच तिने या व्हिडियोमध्ये आपल्या फॅन्सला सांगितले आहे की,’मित्र मैत्रिणींनो मी रुग्णालयात असून येथील नर्स माझी तपासणी करत आहे. मी आजारी असून शॉकमध्ये आहे. कारण नुकतेच पद्मश्री पुरस्कार मिळालेली एक अभिनेत्री जे काही बरळली, त्याने मला जबर धक्का बसला.’
ती पुढे म्हणाली,’आपल्याला 1947 साली जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हे, तर भीक होती, असं कंगना म्हणाली. मी माझ्या देशावर खूप प्रेम करते. मला माहितीये, तुम्हांलाही तुमच्या देशावर प्रेम आहे. अशा लोकांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. भीक तर तुला मिळाली आहे. भीक मागून तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आपल्या देशाच्या जवानांनी कारगिल जिंकले, त्यांचे बलिदान व्यर्थ आहे का? तुझा पद्श्री घे अन् घरी गप्प बस. तुला तर नरकातही जागा मिळणार नाही… अशी राखी म्हणाली आहे.