Top Electric Scooters Under 1 lakh: बदलत्या काळानुसार तरुणांमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलरची क्रेझही वाढत आहे. ग्राहकांच्या गरजा आणि खिशाचा विचार करून कंपन्या इलेक्ट्रिक दुचाकींचे नवीन मॉडेल्सही बाजारात आणत आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एका चार्जमध्ये प्रवास करू शकता. चला अशा 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल ( electric scooter ) जाणून घेऊया, ज्या 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये ( electric scooter under 1 lakh ) जलद चार्जिंगचा दावा करतात.
1. Greta Electric Glide
या स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरी असेल, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किमीची ड्रायव्हिंग रेंज देईल. या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी किमान 2.5 तास लागतील असा कंपनीचा दावा आहे. यात अँटी थेफ्ट अलार्म, फ्रंट ग्लोव्ह बॉक्स, लाईट डिझायनर कन्सोल आणि ‘एक्स्ट्रा-लार्ज लेक फॉर्म’ देण्यात आला आहे. या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 80,000 रुपये आहे.
2. AMO Electric Jaunty
या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 59,966 ते 90,064 रुपये आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 90 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. ही स्कूटर 6 तासात फुल चार्ज होते. तिचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे.
3. Joy E Bike Wolf
जॉय ई बाईकच्या वुल्फ इलेक्ट्रिक स्कूटरला 100% चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात. पण फास्ट चार्जरच्या मदतीने तुम्ही 2.5 तासांत पूर्णपणे चार्ज करू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 90 किलोमीटर आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ती 83,662 – 95,298 रुपयांना मिळेल.
4. Ampere Zeal EX
सुमारे 96,690 किंमत असलेली, ही इलेक्ट्रिक स्कूटर 60v, 2.3 kWh प्रगत लिथियम बॅटरीसह येते, जी पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास घेते. कंपनीचे म्हणणे आहे की ती एका चार्जवर 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तिचा टॉप स्पीड 50-55 किमी आहे.
5. Ola S1X
ओला कंपनीचा दावा आहे की त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल S1X 3 kW बॅटरी पूर्ण चार्ज 7.5 तासांमध्ये होते. जर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर ओला हायपर चार्जरवरून १५ मिनिटांसाठी चार्ज केली तर तुम्ही जवळपास ५० किलोमीटरपर्यंत गाडी चालवू शकता. Ola S1X ची रेंज सुमारे 151 किलोमीटर आहे अस सांगण्यात येत. तिची किंमत 1 लाखांपेक्षा कमी आहे.