Telangana : तेलंगणामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री महमूद अली हे अचानक बेशुद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर उपस्थितींचा एकच गोंधळ उडाला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
देशभरामध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या खास दिनानिमित्त तेलंगणा भवनामध्येही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री महमूद अली हे देखील उपस्थित होते. मात्र कार्यक्रम सुरू असतानाच अचानक त्यांची बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. यावेळी त्यांच्यावर कार्यक्रमस्थळी प्राथमिक उपचार केले त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले.
#WATCH | Hyderabad: Former Telangana Deputy CM Mahmood Ali faints during #RepublicDay2024 celebrations at Telangana Bhawan. pic.twitter.com/GCzoMb9l8U
— ANI (@ANI) January 26, 2024
दुसरीकडे, राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. त्याचबरोबर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. यावेळी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये फ्रेंच तुकडीही सहभागी झाली होती.
कोण आहेत महमूद अली?
महमूद अली हे केसीआर यांच्या पक्ष बीआरएसचे नेते आहेत. ते 2014 ते 2018 पर्यंत तेलंगणाचे उपमुख्यमंत्री होते. केसीआरच्या दुसऱ्या कार्यकाळात महमूद अली यांना राज्याचे गृह मंत्रालय, तुरुंग आणि अग्निशमन सेवा ही खाती देण्यात आली होती.