vijay wadettiwar – पंढरपुरात काही समाजकंटकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा दावा राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंठकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. या समाजकंठकांवर सरकारने कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या मातीत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही. pic.twitter.com/dbbnO0le6t
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 26, 2024
या घटनेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नथुराम गोडसेचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. या व्हिडिओ राजकारण तापले आहे. विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्टवर म्हटलं आहे की, ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंटकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. या समाजकंटकांवर सरकारने कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या मातीत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही.’ या व्हिडिओ युजर्सच्या प्रतिक्रिया येत आहे.