नाशिक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सध्या नाशिक दौरा सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज नाशकात आहेत. त्याचवेळी येथे एका महिलेने अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलीस आयुक्तालयासमोरच ही घटना घडली आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या राजलक्ष्मी पिल्ले महिला युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत. राजलक्ष्मी यांनी पतीसमवेत पोलीस आयुक्तालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
श्रमिक सेनेचे अजय बागुल यांच्या कडून झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही. या घटनेचा निषेध म्हणून पिल्ले दाम्पत्याने आयुक्तालयापुढे आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Video : मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा; पोलीस आयुक्तालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न pic.twitter.com/3tSJ711v5V
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 9, 2021
आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी पिल्ले दांपत्याला ताब्यात घेतलं आहे. या दाम्पत्याने अंबड पोलीस स्टेशन आणि इंदिरानगर पोलिसकडे बागुल यांची तक्रार केली होती.