राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) – चिपळूण महाड पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून दानशूर व्यक्तींनी येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनकडे जमा केलेली मदत आज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रवाना झाली. तेथे जाऊन हि मदत पुरग्रतांना वाटप करण्यात येणार आहे.
चिपळूण महाड येथे महापूर आला होता. कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त कुटुंबाला सर्व प्रकारची मदत मिळावी. यासाठी येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पाउंडेशनकडे देश विदेशातून मदत प्राप्त झाली आहे.
यात रोख रक्कम, कपडे, पाणी, खाद्य पदार्थ यांचा समावेश आहे. गोळा झालेली मदत क्रांतिदिनाच्या औचित्य साधून आज (दि.९) रोजी पूरग्रस्तांना देण्यासाठी कार्यकर्ते स्वतः घेऊन कोकणात गेले आहेत. जवळपास २५ वस्तू असलेले किट रोख रक्कम पूरग्रस्त कुटुंबाला देण्यात येणार आहे.
आज सकाळी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी एक ट्रक भर मदत घेऊन कोकणाकडे रवाना झाले. या मदतीच्या गाडीला खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांच्या हस्ते मदतीच्या गाडीचे पूजन करून मदत पाठविण्यात आली.
हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड.मनीषाताई पवळे, उपाध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, कार्याध्यक्ष राहुल मलघे, प्रियांका दिघे, सुनील वाळुंज, संगीता तनपुरे, अमर टाटीया, संतोष सांडभोर, दिलीप होले, कैलास दुधाळे, राजन जांभळे, दत्ता रुकें, उत्तम राक्षे, मधुकर गिलबिले, नाजनिन शेख, बाळासाहेब गोरडे, संदीप जाधव,आकाश बोंबले उपस्थित होते.