झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यामुळे आता ही मालिका जोरदार लोकप्रिय झाली आहे. मालिकेमध्ये अण्णा आणि माई यांचं पटत नसलं, तरी प्रत्यक्षात हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेच्या सेटवरील अण्णा आणि माई यांचे काही टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या दोघांची धमाल केमिस्ट्री पाहून नेटकरीही त्यांच्यावर जाम फिदा झाल्याचे दिसून येत आहे.
मराठीतील काही लोकप्रिय गाण्यांवर अण्णा आणि माई यांचे कमाल हावभाव या व्हिडीओचे हायलाईट ठरत आहे. मालिकेतील शेवंता आणि अण्णांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी कमाल आहे, तितकीच आता अण्णा आणि माई यांच्या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.