लंडन – चीनसह अनेक देशांमध्ये हाहाकार उडविलेल्या करोना विषाणूंचा धसका आता क्रिकेटसह क्रीडा क्षेत्रालाही बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. इंग्लंडचा संघ लवकरच श्रीलंकेचा दौरा करणार असून करोनाच्या धसक्यामुळे आमचे खेळाडू श्रीलंकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलनही करणार नाहीत, असे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने सांगितले आहे.
जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला करोनामुळे फटका बसण्याचा धसकाच आता खेळाडूंनी घेतला आहे. त्याचबरोबर क्रिकेटलाही करोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
इंग्लंडच्या संघातील खेळाडू श्रीलंका दौऱ्यात खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत. इंग्लंडच्या खेळाडूंना करोनाचा धोका वाटत असल्यानेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे रुटने स्पष्ट केले आहे.