वाघोली (प्रतिनिधी) – पूर्व हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिकऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात मोठ्या उत्साहात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टी मध्ये दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
माजी उपसरपंच विलास सातव,माजी सरपंच हेमंत सातव,वाल्मिक सातव,आव्हळवाडी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सातव,गणराज तरुण मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर सातव, योगेश सातव, निलेश सातव, महेश सातव,अमोल सातव, विलास सातव, विकी सातव,उमेश सातव , विकास सातव, निखिल सातव, ऋतिक सातव,विजय पाटील,निलेश सातव,
चैतन्य सातव , संदीप सातव, बबलू बाजारे,धनजी गोरे, शुभम लोखंडे, सौरभ सातव, मोहन पाटील,गणेश साळुंखे,पप्पू मुळे, किरण सातव,दीपक कामती,शैलेश खोपटीकर, सुरेश ढेरे,विजय रुईकर,कमल तिवारी, भानेंद्र सिंग,किशोर साबळे,देवेन व्होरा, प्रदीप पाटील आदींनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदिप सातव, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गणेश कुटे, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा सचिव अविनाश सातव पाटील,प्रदिप सातव गणेश सातव, विजय जाचक ,राहुल कुटे, राजेंद्र राखपसरे, शरद आव्हाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
हवेली तालुक्यात भाजप पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून या पुढील काळात देखील ही संख्या वाढून पक्ष बळकट करण्याचे काम भाजप नेते राहुल कुल, प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
– संदीप सातव (संघटन, सरचिटणीस पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा)