नवी दिल्ली : श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांचा नेता आणि तमिळ लिबरेशन टायगर ईलमचा (LTTE Leader) नेता व्ही. प्रभाकरन अजूनही जिवंत असून त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. हा दावा तमिळ संघटनांच्या जागतिक महापरिषदेचे अध्यक्ष पी नेदूमारन यांनी केला आहे.
लिट्टे या तमिळ वाघांच्या संघटनेचा प्रमुख असलेला व्ही.प्रभारकन याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर येथे झालेल्या भीषण हत्येत त्याचा सहभाग होता. ही हत्या होण्यापूर्वीही एकदा प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या हत्येनंतर अचानक लिट्टेकडून प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आला होता.
LTTE leader Prabhakaran is not dead. He is alive.
– Senior Leader pazha Nedumaran
— Raja Shanmugasundaram (@SRajaJourno) February 13, 2023
श्रीलंकन लष्कराने तमिळ बंडखोरांचा नायनाट करण्यासाठी जाफना आणि उत्तर श्रीलंकेत केलेल्या लढाईत लिट्टे सह त्याचा प्रमुख व्ही प्रभाकरन ही मारला गेल्यचे जाहीर करण्यात आले होते. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) या संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन अजूनही जिवंत आहे आणि तो आपल्या कुटुंबासह राहत आहे, असा दावा आता माजी काँग्रेस नेते पाझा नेदुमारन यांनी केला आहे. नेदुमारन यांनी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
तंजावरमधील मुल्लिवाइक्कल मेमोरिअलमध्ये सोमवारी माजी काँग्रेस नेते पाझा नेदुमारन यांनी, तमिळांच्या जागतिक महासंघाचे प्रमुख नेदुमारन लवकरच इलम तमिळ नागरिकांच्या चांगल्या जीवनासाठी नवीन योजना जाहीर करतील. एलटीटीई प्रमुख लवकरच लोकांसमोर येणार असल्याचा दावा नेदुमारन यांनी केला.