मुंबई – टीव्ही जगतात सर्वाधिक टीआरपी असलेला शो म्हणून हिंदी ‘बिग बॉस’कडे पाहिले जाते. अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. सध्याचा ‘बिग बॉस 16’चा सिझन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरत आला होता. यंदाचा सीजन अनेक कारणांमुळे चर्चेत ठरला आहे. घरातील भांडण असो व स्पर्धकांमधील मैत्रीचं नातं हे सगळंच प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करत आहे. दरम्यान, 19 आठवड्यांच्या दीर्घ पर्वाला काल नवा विजेता मिळाला आहे.
शिव ठाकरे, प्रियंका चाहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट या टॉप 5 स्पर्धकांमध्ये बिग बॉस 16 चा महाअंतिम सोहळा रंगला. फिनाले सुरू होताच काहीच तासात आधी शालीन आणि त्यानंतर अर्चना घराबाहेर पडले. त्यानंतर विजेतेपदाचा महत्त्वाचा दावेदार असणाऱ्या प्रियंकाला घराबाहेर जावे लागले. ती विजेता होईल असे लाखो चाहत्यांना वाटत होते.
मात्र बिग बॉसच्या ट्रॉफीवर वेगळ्याच स्पर्धकाचं नाव लिहिलं होतं. फायनलमध्ये शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेजण होते. वोट सर्वात जास्त मिळाल्याने ‘एमसी स्टॅन ‘हा बिग बॉस 16 चा विजेता झाला. यावेळी त्याला बिग बॉसची चमचमती ट्रॉफी आणि सोबतचं 31 लाखांची रक्कम मिळाली. मात्र, या स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय रनरअप असलेली प्रियंका चौधरी बिग बॉस 16 जिंकू शकली नसली तरी तिने 25 लाख रुपये जिंकल्याचे म्हटले जात आहे.
इतकचं नाही तर तिला श्रद्धा कपूरच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली आहे. इतकचं नाही तर प्रियंकाच्या झोळीत चित्रपटही पडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तिला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटात भूमिका मिळाली आहे. तसेच आगामी काळात प्रियांका सलमान खान आणि साजिद खान यांच्या देखील सिनेमात झळकणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.