पुणे – मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीच्या 2 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या 8 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. शाहवेज शहजाद अन्सारी (25 रा. शिवाजी मार्केट कॅम्प मुळ नगिना बिजनोर राज्य उत्तरप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, युनिट सहाचे पोलीस अंमलदारांना माहिती मिळाली की, वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयातील मोटार सायकल चोरणारा हा कॅम्प परिसरामध्ये फिरत आहे. त्यानूसार अन्सारीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोटार सायकलबाबत तपास करता सदरची मोटार सायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न
झाले. आरोपीस गुन्हयात अटक करून त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली.
पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान, आरोपीने वानवडी, लोणीकंद, कोंढवा, शिक्रापुर, तोफखाना (जिल्हा अहमदनगर), सुपा (जिल्हा अहमदनगर), हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे. आरोपी एका बेकरीमध्ये काम करत होता. मौजमजेसाठी पैसे हवे असल्याने तो दुचाकी चोरुन विकत होता. दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली.