Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे नेहमीच प्रेक्षकांकडून कौतुक केले जाते. त्यानंतर आता वरूणने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या वरूणने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वरुण धवन लवकरच बाबा होणार आहे. वरुणची पत्नी नताशा गरोदर असून लवकर त्यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. वरुणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. वरुणने नताशा व त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले आम्ही प्रेग्नंट आहोत, आम्हाला तुमच्या प्रेमाची व आर्शिर्वादाची गरज आहे.” वरुणची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टनंतर चाहत्यांकडून तसेच सेलिब्रिटींकडून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
वरुण आणि नताशाने 24 जानेवारी 2021 रोजी लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या तीन वर्षानंतर दोघे आई-बाबा होणार आहेत. लग्नाअगोदर दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता वरुणने पोस्ट शेअर बाबा होणार असल्याचा आनंद व्यक्त केला आहे. वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, मागील वर्षी त्याचा अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत ‘बवाल’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला.
आता लवकरच वरुणचा ‘बेबी जॉन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तो ‘सिटाडेल’ चित्रपटातही झळकणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री सामंथा प्रभुची मुख्य भूमिका आहे.